google.com, pub-1577989701626530, DIRECT, f08c47fec0942fa0

Kalyan : मुलाच्या हव्यासापोटी चार वर्षाच्या चिमुकल्याच अपहरण, कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार; आठ तासातच पोलिसांनी घेतला मुलाचा शोध

Kalyan News : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधून एका व्यक्तीनं चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली.
याप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तपास करत अवघ्या आठ तासात या मुलाचा शोध घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कचरु वाघमारे असे मुलाला अपहरण केलेल्याचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे कचरु वाघमारेला चार मुली आहेत. मुलाच्या हव्यासापोटी त्याने या चिमुकल्याचे अपहरण केल्याचं तपासात समोर आलं आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे करण गुप्ता आणि त्यांची पत्नी शुभांगी गुप्ता हे दोघे मजुरीचे कामं करतात. त्यांना दोन वर्षाची मुलगी कीर्ती आणि चार महिन्याचा अथर्व ही दोन मुलं आहेत. सकाळी कपडे धुण्यासाठी ते कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये आले होते. मात्र, साबण नसल्याने आपल्या दोन्ही मुलांना बाहेर खेळताना सोडून ते साबण घेण्यासाठी स्टेशन बाहेर आल्या. यावेळी त्यांच्या मुलांसोबत आणखी चार मुली त्या ठिकाणी खेळत होत्या. त्या ठिकाणी एक जोडपे होते. त्यांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगून करण आपल्या पत्नीसह साबण आणण्यासाठी गेला. साबण घेऊन परतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. अथर्व आणि त्यांच्यासोबत खेळत असलेले चारही मुली तिथे नव्हत्या. करणने आजूबाजूला आपल्या मुलाचा शोध घेतला मात्र मुलगा आढळून आला नाही. अखेर त्याने कल्याण रेल्वे गुन्हे पोलीस ठाणे गाठले. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तत्काळ या मुलाचा शोध सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मुलाच्या शोधासाठी पथके नेमली. सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास  एक व्यक्ती अथर्वला घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर आढळून आला. हा व्यक्ती नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाईत होता. रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्यावर झडप घालत त्याला ताब्यात घेत, मुलाची सुटका केली.

चौकशी दरम्यान या व्यक्तीचे नाव कचरू वाघमारे असल्याचे समोर आलं आहे. कचरू वाघमारेला चार मुली होत्या. त्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी त्याने चार वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी कचरुला ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/Qd3OSy8 News : मिरजेत अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार करुन गळा कापला; गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाचे कृत्य
https://ift.tt/6mjOq2b

Post a Comment

0 Comments