पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (SPPU) संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांच्या शनिवार, 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रपतींचा दौरा आणि सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने हा तातडीचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

President Visit Nashik Traffic : नाशिक पालिका आयुक्तांच्या सूचनेनंतर निर्णय

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नाशिकमध्ये राष्ट्रपतींच्या दौऱ्यासह सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचा भव्य सोहळा पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येऊन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे कठीण होईल, असे नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी विद्यापीठाला कळवले होते. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने 31 ऑक्टोबरचे सर्व पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

New Exam Date 11 November : आता 11 नोव्हेंबर रोजी होणार परीक्षा

31 ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आलेल्या सर्व विषयांच्या परीक्षा आता सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी घेतल्या जाणार आहेत. परीक्षेचे ठिकाण, सत्र आणि वेळेबाबत डॉ. राजेंद्र तलवारे यांनी स्पष्ट केले की, रद्द झालेल्या विषयांचे सर्व पेपर 11 नोव्हेंबर रोजी मूळ वेळापत्रकातील पूर्वनियोजित वेळेनुसारच पार पडतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या तारखेची नोंद घेऊन परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

ही बातमी वाचा:

Thane Honeytrap Case : मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात 1.39 कोटींच्या खंडणीचा गुन्हा! उद्योगपतीला ब्लॅकमेल करून उकळले कोट्यवधी रुपये

from Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली? https://ift.tt/CZ36zWb
via IFTTT

0 Comments