Mhada Lottery 2023 : अखेर प्रतीक्षा संपली, म्हाडाच्या मुंबईतील 4083 घरांसाठी आज सोडत!

मुंबई (Mumbai) : मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. म्हाडाच्या (Mhada) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत घरांसाठी आज (14 ऑगस्ट) सोडत काढण्यात येणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात सोडत सकाळी 11.30 वाजता काढण्यात येणार आहे. सदनिका विक्रीची सोडत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

4083 घरांसाठी आज सोडत

22 मे रोजी 4083 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मुंबईतील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन इथे उभारण्यात आलेल्या 4082 घरांच्या विक्रीसाठी ही सोडत निघणार आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एक लाख 20 हजार 144 पात्र अर्जाची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

घरबसल्या सोडतीचं थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा

सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा यासाठी सभागृहाच्या आवारात आणि सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचं घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
https://www.youtube.com/live/UsZDZUL3YyA?feature=share या लिंकवर क्लिक करुन तुम्ही म्हाडा मुंबई बोर्डाच्या लॉटरीचे थेट प्रक्षेपण पाहू शकणार आहात.

म्हाडाने यंदापासून सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतल्याने अर्जदारांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणीदेखील ऑनलाईन करण्यात आली. यापूर्वी लॉटरी जारी केल्यानंतर अर्जदारांचे कागदपत्रे मागवले जात होते, मात्र त्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होण्यासाठी एक ते दोन वर्ष लागत होते. अशात विजेत्यांना लॉटरी जिंकल्यानंतरही प्रत्यक्षात घराची चावी हातात येण्यास अनेक वर्ष लागत होते. आता हे काम अडीच महिन्यांतच पूर्ण होणार आहे.

कोणत्या गटासाठी किती अर्ज?

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सोडतीत जाहीर 4082 सदनिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1947 सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव इथे असून या घरांकरता 22,472 अर्ज प्राप्त झाले आहेत.

अत्यल्प उत्पन्न गटातील 843 सदनिकांसाठी 28 हजार 862 अर्ज प्राप्त झाले आहेत. या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी (415) या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत.

तसंच अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिकांसाठी 60 हजार 522 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगाव (416) या योजनेकरता आहेत आहेत.

तर मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांसाठी 8395 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत.

उच्च उत्पन्न गटातील 120 सदनिकांसाठी 2068 अर्ज प्राप्त झाले आहेत. या गटातील सर्वाधिक अर्ज शिंपोली कांदिवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेसाठी आहेत.

हेही वाचा

<a class="topic_text" title="Mhada: म्हाडाला मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी मुहूर्त मिळेना? सोडत जाहीर होत नसल्याने अर्जदार संतप्त" href="https://ift.tt/bcerAJB म्हाडाला मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी मुहूर्त मिळेना? सोडत जाहीर होत नसल्याने अर्जदार संतप्त
https://ift.tt/Lthpilm

Post a Comment

0 Comments