आताची सर्वात मोठी बातमी समोर येतीय डिप्लोमा अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांना मिळणार कॅरी फॉरवर्ड
आता च्या माहिती नुसार डिप्लोमा च्या विद्यार्थ्यांना मिळणार OTT/Carre Forword ऑप्शन
हो आताच चंद्रकांत दादा पाटील ( उच्च व तंत्रशिक्षणमंत्री महाराष्ट्र) ट्विट करून ही माहिती दिली .
या ट्विट नुसार डिप्लोमा अभियांत्रिकी च्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार कॅरी फॉरवर्ड ची सुविधा या
आता पर्यंत मिळालेल्या माहिती नुसार 1st year, 2nd year, डिप्लोमा अभियांत्रिकी चा विद्यार्थ्याना one time कॅरी फॉरवर्ड चा लाभ घेता येईल
या मुळे 1 क लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल
चंद्रकांत दादा पाटील (ट्विट)
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत विद्यार्थी हितास्तव एक विशेष बाब म्हणून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुढील सत्र / वर्षाचे सत्रकर्म पुर्ण करण्यासाठी एक वेळ संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज घेतला. सदर निर्णयामुळे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील साधारणतः २२,००० विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्याकरीता तसेच ३६,००० विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाचे सत्र कर्म पुर्ण करण्याकरीता संधी उपलब्ध होणार आहे. तरी, याचा सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो.
0 Comments