google.com, pub-1577989701626530, DIRECT, f08c47fec0942fa0

युसूफचा पठाणी हिसका,  26 चेडूत 86 धावा; 9 षटकार अन् चार चौकार

Yusuf Pathan Zim Afro T10 2023 : झिम्बाब्वेमध्ये सुरु असलेल्या जिम एफ्रो टी10 लीगमध्ये भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने धमाकेदार खेळी खेळली. युसूफ पठाण याच्या विस्फोटक खेळीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. जोबर्ग बफेलोज संघाकडून खेळताना युसूफने पठाणी हिसका दाखवला. डरबन कलंदर्सविरुद्ध युसूफ पठाण याने अवघ्या 26 चेंडूत 9 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 86 धावांची नाबाद खेळी केली. युसूफच्या या खेळीच्या जोरावर जोबर्गच्या संघाने 10 षटकांत 143 धावांचे लक्ष्य 9.5 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह जोबर्ग संघाने फायनलमध्ये प्रवेश निश्चित केलाय.

युसूफ पठाण याला त्याच्या खेळीबद्दल विचारले असता तो म्हणाला की, माझ्यासाठी हा खूप खास क्षण आहे. हा क्षण माझ्यासाठी आणखी खास झालाय. कारण माझा मुलगा स्टेडिअममधून ही खेळी पाहत होता. त्याला त्याच्या वडिलांचा अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे. मला खात्री आहे की तो देखील या सर्व क्षणांपासून प्रेरणा घेईल आणि एक दिवस भारतासाठी खेळेल.

जिम एफ्रो टी10 लीग स्पर्धेत यूसुफ पठाण हा जोबर्ग बफेलोज या संघाचा सदस्य आहे. या संघाचे नेतृत्व पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हफीज करत आहे.  आपल्या संघाबाबत युसूफ पठाण याने कौतुक केले. यूसुफ पठाण याने झिम्बाब्वेच्या युवा खेळाडूंचेही कौतुक केले. तो म्हणाला की, मला झिम्बाब्वेच्या युवा खेळाडूंबद्दल बोलायचे आहे. जे सतत संघातील प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढवत आहेत. संघातील सर्व खेळाडू आपली भूमिका अतिशय चोख बजावत आहेत. त्यांनी गोष्टी अगदी सोप्या ठेवल्या आहेत. युवा खेळाडूंच्या कामगिरीने मी खूप खूश आहे. कारण ही एक मोठी स्पर्धा आहे आणि जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हा ती तुमच्या भविष्यासाठी चांगली असते.

संघात उपस्थित असलेल्या वरिष्ठ खेळाडूंनी युवा खेळाडूंना आत्मविश्वास देण्याची गरज असल्याचे युसूफने पुढे म्हटले आहे. हे तुमचे काम आहे कारण महत्त्वाच्या सामन्यांमध्ये युवा खेळाडू तुमच्यासाठी मोठी भूमिका बजावू शकतात. दुसरीकडे, युवा खेळाडू जेव्हा अशा परिस्थितीत चांगली कामगिरी करतात, तेव्हा त्यांच्या कारकिर्दीसाठीही ही खूप चांगली गोष्ट असते. मी लहान असताना मलाही माझ्या वरिष्ठ खेळाडूंकडून अशा गोष्टी शिकायला मिळाल्या, असे युसूफ पठाण म्हणाला.

आणखी वाचा :

<a href="https://ift.tt/RwYTV74 Indies vs India, 2nd ODI : विडिंजने हिशोब केला चुकता, भारताचा सहा विकेटने पराभव

<a href="https://ift.tt/ATZ96m1 vs WI : सूर्या-सॅमसन-पांड्या सगळेच फ्लॉप, विश्व कप 2023 आधी टीम इंडियाचे फलंदाज ढेपाळले
https://ift.tt/6d0rlRE

Post a Comment

0 Comments